
वीज मीटर काढले नसल्याने नवीन भाजी मार्केटची इमारत पाडण्याचे काम थांबले.
न्यायालयाने दिलासादायक निकाल दिला नसल्याने रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केटमधील गाळे रिकामे करून रत्नागिरी न.प.च्या ताब्यात दिले. काही गाळेधारक वीजबिल थकीत असल्याने महावितरणने त्या इमारतीतील गाळेधारकांचे वीज मीटर काढलेले नाहीत. त्यामुळे आता ही इमारत पाडण्याचे काम थांबवावे लागले आहे.नवीन भाजी मार्केटची इमारत न.प. मालकीची आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक झाली असल्याचा अहवाल आल्यानंतर गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे ताब्यात देण्यास सांगितले.www.konkantoday.com