
दापोलीत साडेसहा लाखाची घरफोडी, संशयित आरोपीला अटक
दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे सुमारे ६ लाख ४० हजाराची घरफोडी करून चोरी केल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. दापोली पोलिसांनी संशयित आरोपी साहिम मुस्तफा ऐनरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निखत रमीज ऐनरकर (३३, रा. मुरुड नवानगर) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुड नवानगर येथे राहत्या घरी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० ते १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या मुदतीत घरी कोणीही नव्हते. त्यांची चुलत सासू फरीदा अन्य ठिकाणी गेली असताना घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आरोपी साहिम ऐनरकरने निखतच्या घराच्या छताची कौले सरकवून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाचे बाहेरील लॉक तसेच लॉकरचे लॉक कोणत्या तरी हत्याराने तोडून लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात लॉ क करून ठेवलेले सुमारे ६ लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यात ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे साईडने सोन्याची पट्टी असलेले मंगळसूत्र, ८० हजार रु. किंमतीचे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ६० हजार रु. किंमतीचे साडेपाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २ लाख ५० हजार रु. किंमतीचा २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार असा ऐवज चोरून नेला. साहिम ऐनरकरला दापोली पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com




