
वाळू डेपो बंद झाल्याने खेडमध्ये वाळूअभावी घरकुलांची कामे रखडली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत येथील पंचायत समितीकडून तालुक्यात घरकुले मंजूर होवून बांधण्यास परवानगी मिळालेली असतानाही वाळूअभावी घरकुलांची काम रखडली आहेत. शासन आदेशानुसार वाळूचे डेपो बंद असल्याने वाळू मिळेनाशी झाली आहे. यामुळे घरकुलांची उभारणी करायची कशी अशी चिंता खेड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना सतावत आहे. छुप्या पद्धतीने १४ हजार ब्रासने वाळूची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील खाडीपट्ट्यात यापूर्वी बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू होता. राजरोसपणे वाळूचे उत्खनन करून वाहतूक देखील सुरू होती. शासनाकडे स्वामित्वधन जमा करून वाळू उत्खनन करून सरकारी जागेत साठेही करण्यात येत होत. मात्र शासन आदेशानुसार वाळूचे डेपोच बंद करण्यात आले आहेत. याचा फटका घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना बसत आहे. www.konkantoday.com