
वाढत्या वीज वाढीवर पर्याय शोधायला गेले आणि बसला भरारी पथकाच्या कारवाईचा फटका.
विज चोरीच्या बाबतीत अलिप्त असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आता वीज चोरीचे प्रकार घडू लागले आहेतवीजमीटरमध्ये छेडछाड करणे, आकडा टाकून वीजचोरी तसेच विजेचा गैरवापर करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ वीजग्राहकांवर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली.रुपयांचे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे.महावितरणकडून प्रत्येक ग्राहकासाठी वीजमीटर उपलब्ध करून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. कोकणात वीजचोरी व थकबाकीचे प्रमाण शून्यावर असताना आता चोरी व थकबाकीचे प्रमाणही वाढू लागले आहे.
विजेचा गैरवापर करणारे १८ ग्राहक सापडले असून, त्यांच्यावर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आकडा टाकणारे तीन ग्राहक सापडले आहेत. वीजमीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या ६४ ग्राहकांवर कलम १३५-१३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीवर निर्बंध आणण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. फिडरवरील वीजवापरानुसार चोरीचा प्रकार निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील तीन ग्राहकांनी आकडा टाकून ३ हजार ६८७ युनिटची चोरी केली. महावितरणचे यामुळे ८२ हजार ६९७ रुपयांचे नुकसान झाले. खेड विभागात २, रत्नागिरीत १ वीजचोर सापडले