
स्वच्छता मोहिमेसाठी चिपळूण नगर परिषदेचा पुढाकार
चिपळूण ः पुरग्रस्त परिस्थितीनंतरही चिपळूण नगरपालिकेने केलेल्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतूक होत असतानाच आता चिपळूण नगरपालिकेने ही मोहीम स्वच्छता मोहीम आणखी बळकट करण्यासाठी ८५ लाख ५० हजार रुपयांच्या नागरिकांना देण्यासाठी कुंड्या खरेदी केल्या जाणार आहेत. एकूण ३८ हजार कुंड्यांचे वाटप होणार आहे. सध्या नगरपालिकेकडे १० लहान मोठ्या अशा कचरागाड्या असून स्वच्छता करण्यासाठी कायमस्वरूपी व ठेकेदारी असे मिळून १३५ कामगार आहेत. दरदिवशी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या फिरत असल्यातरी अनेक नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे अशा कचरा टाकणार्या २० नागरिकांना नगरपरिषदेने नोटीसा पाठविल्या असून त्यांनी त्यात बदल न केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com