
चिपळुणातील ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे काम तातडीने थांबवा, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांची मागणी.
चिपळूण शहरात सध्या १५३ कोटी रुपयांच्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. मात्र या कामावर नियंत्रण व देखरेख करण्यासाठी नगर पालिकेकडे अभियांत्रिकी सेवेतील तज्ञ अभियंता सेवेत नसल्याने योजनेचे काम रामभरोसे सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन देत या योजनेसाठी प्रकल्प समन्वयक सल्लागार (पीएमसी) यांची नेमणूक करावी. तोपर्यंत सुरू असलेल्या कामाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com