
नाणार रिफायनरी मधील जमीन खरेदीची चौकशी होणे आवश्यक – आमदार प्रसाद लाड
नाणार रिफायनरी मध्ये ज्या प्रकारे भूमिपुत्रांकडून कमी दरात जमिनी विकत घेतल्या गेल्या आहेत त्याची चौकशी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे कोकण प्रभारी आ.प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
रिफायनरी मधील झालेल्या जामीन व्यवहारासंदर्भात इडी कार्यरत होतं असल्याच्या वृत्तवर आ. लाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. . यावेळी कोकणात रिफायनरी किती आवश्यक आहे याबाबत बोलताना आ. लाड म्हणाले की कोकणाचा विकास यातून होणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही रिफायनरी कोकणात ठेवण्यासाठी आग्रह धरला. मात्र तेव्हा शिवसेनेने त्याला विरोध केला. पण आता शिवसेनेच्या नेत्यांच्या इथे जमिनी असतील, काही छुपे व्यवहार झाले असतील म्हणून आता रिफायनरीला समर्थन देण्याच्या गोष्टी सेना करतेय असा टोला आ. लाड यांनी लागवला. परंतु नाणार रिफायनरिमध्ये सामान्य शेतकरी, भूमिपुत्रांच्या जमिनी कवडिमोलाने घेऊन मोठे व्यवहार झाले असल्याचा संशय असून त्यात मोठे लॉबीग झाले आहे, त्याची जर इडी मार्फत चौकशी होणार असेल तर ते योग्यच आहे असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com