
नवीन भाजीमार्केट पाडण्यासाठी १८ जुलैचा नवा मुहूर्त
रत्नागिरी शहरातील अतिधोकादायक बनलेल्या नवीन भाजीमार्केटमधील गाळेधारक नगर परिषदेने दिलेल्या नोटीसीविरोधात न्यायालयात गेल्यामुळे ही इमारत पाडण्याबाबत फैसला १८ जुलै रोजी पर्यंत पुढे गेला आहे. त्यामुळे न्यायालयातील त्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असल्याने पुढील कारवाईसाठी नगर परिषदेला प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे न.प.च्या मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले.नगर परिषदेच्या नवीन भाजीमार्केटची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळे तेथील ३२ गाळेधारकांना नोटीस बजावली तसेच इमारतीच्या दोन्ही बाजूला त्या संदर्भातील बोर्डही लावले आहेत. या पावसात इमारत कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका आहे. मनुष्य व जीवितहानी होवू नये, यासाठी ही इमारत पाडण्याचा निर्णय न.प. मालमत्ता विभागाने घेतला आहे. गुरूवारी न.प.च्या कारवाईला गाळेधारकांनी याला विरोध दर्शविला. कारवाईसाठी दिलेली नोटीसविरोधात गाळेधारक न्यायालयात गेले. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने सुनावणी न घेता १८ तारखेला थेट निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाच्या त्या निकालावर ही जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्याची प्रतीक्षा न.प.च्या मालमत्ता विभागाला लागली आहे. www.konkantoday.com