
संघटित समाजच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो-गृहराज्यमंत्री योगेश कदम.
समाजाने एकत्र येण्याची गरज असून, संघटित समाजच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो, असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तालुक्यातील ऐतिहासिक जामगे गावात श्री कोटेश्वरी मानाई देवस्थान येथे क्षत्रीय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन झाले विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरराजे कदम यांनी केले. ते म्हणाले, यापूर्वीचे राज्य स्तरीय संमेलन तुळजापूर, नांदेड, पंढरपूर, गिरवी-फलटण आणि देवगड येथे सहा यशस्वी कुलसंमेलन झाली आहेत