
जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयामधील आँक्सिजन, फायर,इलेक्ट्रिकल आँडिट अहवाल जनतेसाठी प्रसुत कराः समविचारींची जिल्हाधिका-यांकडे मागणी
रत्नागिरीः राज्यभरातील विविध भागातील रुग्णालयांमध्ये आँक्सिजन गळती व इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे आगी लागून रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या होत्या.त्याला अनुसरून अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयामधील आँक्सिजन आँडिट,फायर आँडिट,इलेक्ट्रिकल आँडिट करण्याचे शासनाने निर्देश दिले होते त्या निर्देशाला अनुसरून असे आँडिट झाले का ? झाले असल्यास ते जनतेसाठी प्रसूत करावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
अधिक वृत्तानुसार,राज्यात शासकीय व खाजगी रुग्णालयातील आँक्सिजन वायू नलिकांची,प्रणालीची तपासणी,फायर व स्ट्रक्चरल,सर्व इलेक्ट्रिकल आँडिट करण्यासाठी सर्वत्र समिती गठीत करण्यात आल्या होत्या.याकामी जिल्हा निहाय जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले.रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समिती गठीत झाल्या.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय वगळता अन्य ठिकाणच्या आँडिट बाबत काय झाले ? असे आँडिट झाले असल्यास त्याची माहिती जनतेला मिळावी अशी मागणी जनतेच्या वतीने समविचारी मंच प्रमुख बाबा ढोल्ये,संजय पुनसकर,श्रीनिवास दळवी,रघुनंदन भडेकर,निलेश आखाडे,मंदार लेले,राजाराम गावडे,अनिकेत खैर,आविष्कार नांदगावकर,अमोल सावंत,गंधाली सुर्वे,आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यभरात या समिती गठीत झाल्या.त्या त्या जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त शासकीय स्तरावर समिती गठित करण्याचे धोरण अवलंबून रुग्णालये तपासणी करुन माहिती मिळवली.त्यातील तातडीने करावयाची सुचवलेली दुरुस्ती त्वरित करण्यावर भर दिला.अशाच स्वरुपात रत्नागिरी जिल्ह्यात आँडीट झाले असल्यास गठीत समितीचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी समविचारीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
