
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५५५ घरात सौरप्रकाश.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १ हजार ६०२ ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५५५ लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौर यंत्रणा बसविली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळात प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विजेची बचत होण्यास मदत होणार आहे.महिनाभरात ३०० युनिटपर्यंत वीज वापरणार्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौरउर्जा निर्मितीची रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणार्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रूपये, दोन किलोवॅटच्या क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.www.konkantoday.com