
दिल्लीत भाजप सुसाट, ‘आप’ पिछाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज शनिवारी मतमोजणी सुरु आहे. ७० विधानसभेच्या जागांपैकी ३६ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली आहे.तर आम आदमी पक्ष २० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे.आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत. दिल्ली कँट येथून भाजपचे भुवन तंवर आघाडीवर आहेत.
जनकपुरी येथून आपचे उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत. करावल नगर येथून भाजपचे कपिल मिश्रा यांनी आघाडी घेतली आहे.