
रत्नागिरीत ग्रामीण भागातील अनेक गावात कचरा उघड्यावरच.
शासनाच्या १०० दिवस उपक्रमांतर्गत जिल्ह्यामधील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिकमुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम पंधरा दिवसांपूर्वी पार पडली. या मोहिमेमुळे घनकचरा, व्यवस्थापनाबद्दल जनजागृती होण्यास निश्चितच मदत झाली असेल परंतु केवळ एका दिवसापुरती साफसफाई मोहीम करून ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्ह्यात शहरानजिक अशी अनेक गावे आहेत की, जेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला असतो. यावर पर्याय म्हणून काही ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा जाळून नषट केला जातोय. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अपायकार बनलेला हा कचर्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि नगरपरिषदांनी संयुक्तरित्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक बनले आहे.www.konkantoday.com