
मुंबई-गोवा महामार्गावर यावेळी देखील चाकरमान्यांचा खड्ड्यातूनच प्रवास
शासनाचे काम आणि दहा वर्षे थांब, ही म्हण बदलण्याची वेळ आली असून तब्बल १४ वर्षाच्या प्रखर कालखंडानंतरही मुंबई-गोवा महामार्गाची वाट बिकटच असल्याची लाजिरवाणी स्थिती असल्याचे पहायला मिळत आहे. चाकरमान्यांचा यंदाही खड्ड्यातूनच प्रवास होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महामार्गावरील लोणेरे ते कोलाड आणि कोलाड ते नागोठणे दरम्यानच्या अंतराची अवस्था अत्यंत बिकट असून यंदाच्या या पावसाळ्यात अनेक ठिकाणी होडीत बसून प्रवास करावा लागेल की काय, अशी भीती प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.मुंबई, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी अनेक आंदोलने केली. आता यंदाही आंदोलन केले जाणार आहे. www.konkantoday.com