
महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली.पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली.धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे जात होत्या. त्याचवेळी सोरतावाडी या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला त्यांच्या कारने मागून धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.




