
काल दिल्लीत तीन माकडं बसून ईव्हीएम वर बोलत होती, ही माकड आज आहेत कुठे?- मंत्री नितेश राणे
दिल्लीचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दिल्लीकरांनी ठेवलेला विश्वासाचा विजय आहे. काल दिल्लीत तीन माकडं बसून ईव्हीएम वर बोलत होती, ही माकड आज आहेत कुठे?असा सवाल करताना कालच्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेवर नितेश राणे यांनी टीका केली. 27 वर्षानंतर दिल्लीच्या जनतेने जो विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दाखवलेला विश्वास आहे. या निकालावरून राहुल गांधीची लायकी समजली, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिल्लीच्या निकालावर दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही जागा वक्फ बोर्डला दिली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून मी नक्कीच काळजी घेईन. प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला भरघोस असा निधी दिला जाईल. याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल.