
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी होतीशिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.
जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीमध्ये होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे सुनावणी एक दिवस आधी घेण्यात येत असल्याची माहिती आहे. याच प्रकरणात 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
www.konkantoday.com