महावितरणाची शासकीय कार्यालयानेही बीले थकवली
महावितरण कार्यालयामार्फत देखील वीज बिल थकबाकीची वसुली मोहीम सुरू झाली आहे. महावितरणच्या चिपळूण विभागांतर्गत तब्बल दोन कोटींची थकबाकी आहे.विशेषकरून शासकीय कार्यालयेदेखील थकबाकीदार बनली असून चिपळूण पं. स. तथा गटविकास अधिकारी देखील थकबाकीदारांच्या यादीत आले आहेत. चिपळूण पं. स.कडे महावितरणची वर्षभराची 1 लाख 21 हजार 60 रुपयांची थकबाकी असल्याचे पुढे आले आहे.
महावितरणच्या माध्यमातून अलीकडे जोरदार वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी थकीत वीज बिल भरावे म्हणून रिक्षाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकावर आवाहन केले जात आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यात महावितरणचे एकूण 12 हजार 93 थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यांची 1 कोटी 97 लाख 490 रुपयांची थकबाकी आहे.