लवकरच अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाची स्थापना होणार.
अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन करून त्याद्वारे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत नुकताच झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शिरगाव येथे अत्यंत उत्साहात झाली.
या बैठकीसाठी राज्यभरातून १७ जिल्ह्यातून १२५ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव, राज्य विभागाचे कार्यवाह, राज्य कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते. या अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये संघटनेच्या पुढील कामाची दिशा म्हणून महत्वाचे सात ठराव घेण्यात आले.www.konkantoday.com