
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ट्रक कोसळला
रत्नागिरी ः पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वाहतूक करणारा ट्रक ८०० फूट खाली दरीत कोसळला आहे. महाबळेश्वर भागातील ट्रेकर्स त्याचा शोध घेत आहेत. कोकण परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्याच वर्षी आंबेनळी घाटात कोकण कृषि विद्यापीठाची बस कोसळून अनेकांचा बळी गेला होता. त्यानंतरही घाटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना झालेली नाही.