
६५ वर्षीय वृद्धाच्या लाळग्रंथीतील स्टोन काढण्यात ’डेरवण’ वैद्यकीय पथकाला यश
रुग्णाच्या ६५ वर्षीय वृद्ध लाळग्रंथीतील स्टोन काढण्याची अतिक्लिष्ट अशी सर्जरी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील इएनटी विभागातील वैद्यकीय पथकाने यशस्वी केली.
या रुग्णाला एका महिन्यापासून त्रास होत होता. स्थानिक डॉक्टरांच्या गोळ्यांनी तात्पुरता फरक पडत असल्याने त्याने वालावलकर रुग्णालयाच्या इएनटी विभागात डॉ. प्रतिक शहाणे यांना दाखवले. रुग्णाची सोनोग्राफी व एमआर सियालोग्राफी तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासणीतच हा त्रास लाळ ग्रंथीचा आजार असल्याचा अंदाज डॉक्टरांना होता. सोनोग्राफी व एमआर सियालोग्राफीने यावर शिक्कामोर्तब झाले. लाळग्रंथीतील स्टोन साठी सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतिक शहाणे यांनी अतिकलिष्ट सर्जरी करून १५ मि.मी. स्टोन व बाजूची लाळग्रंथी बाहेर काढली. वैद्यकीय पथकाने कुशलतेने सर्जरी यशस्वी केली. त्यांना भूलतज्ञ डॉ. गौरव, डॉ. हिमानी, डॉ. प्रदीप पाटील यांनी साथ दिली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.www.konkantoday.com




