सुसाट कारचालकाने दिली पादचाऱ्यांसह दोन दुचाकीस्वारांना धडक

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने भरणे गावानजीक एका पादचाऱ्याला धडक दिली व समोरून येणाऱया दोन दुचाकी स्वारांना देखील धडक दिली या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात भरणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया या कारने महामार्ग चौपदरीकरणाचा काम करणाऱ्या कामगाराला पहिली धडक दिली त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱया दोन दुचाकीस्वारांनाही कारने धडक दिली या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे

Related Articles

Back to top button