रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांमध्ये विभागलेल्या दिव्यांगांनी एकत्र येऊन प्रहारच्या माध्यमातून संघर्ष करावा -बच्चू कडू
दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष, दिव्यांगांचे हृदय सम्राट श्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली.कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांची निवेदने स्विकारण्यात आली. यावेळी श्री बच्चुभाऊ कडू यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांमध्ये विभागलेल्या दिव्यांगांनी एकत्र येऊन प्रहारच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी दिव्यांग समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेत अधिकृत प्रवेश केला.