
स्पाय ग्रुपच्या सदस्यांची कौतुकास्पद कामगिरी
संगमेश्वर तालुक्यातील आंबव गावतील स्पाय ग्रुपचे सदस्य दर्शन विभूते व विक्रांत उकार्डे ह्यांनी कासे पुलावरुन स्कुटरवरुन जाणाऱ्या महिलेच्या हातातून पिशवी पडल्याचे पाहिले. तत्काळ त्या दोघांनी ती पिशवी तपासली असता त्या पिशवीत अस्मिता अनंत जड्यार या महिलेचे कागदपत्र व रोख रुपये 2 लाख होते.
क्षणाचाहि विलंब न करता त्या पिशवीतले कागदपत्र व पैसे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे सुपूर्त केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday
com