रत्नागिरीत खगोलशास्त्र अभ्यासक्रम सुरू
रत्नागिरी येथील चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर मुंबई विद्यापीठ उपपरिसर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे खगोलशास्त्र विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे. याची नावनोंदणी दि. १० जानेवारीपर्यंत सुरू राहील आणि दि. १५ जानेवारी पासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम स्वतः करू शकतील. अभ्यासक्रमाच्या अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी प्रा.शिरीन लिमये- रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्र, डॉ. विवेक भिडे, प्रा. निशा केळकर- खगोल अभ्यास केंद्र, भौतिकशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com