
नाशिकजवळ भीषण अपघात, 200 फूट खोल दरीत बस कोसळून 7 जणांचा मृत्यू
नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात आज (2 फेब्रुवारी) सकाळी एक भीषण अपघात झाला. 50 भाविकांना घेऊन जाणारी एक खाजगी लक्झरी बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.तर, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बस कोसळताच तिचे अक्षरश: तुकडे झालेभाविकांनी भरलेली ही बस कुंभमेळ्याहून येत होती आणि गुजरातमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी जात होती. दरम्यान, सापुतारा येथील मालेगाव घाटाजवळ हा अपघात झाला.सकाळी साडेपाचच्या सुमारास नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटाजवळ एक खाजगी बस अनियंत्रित झाली आणि 200 फूट खोल दरीत कोसळली. बस अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मदत करण्यासाठी तातडीने धाव घेतली. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अपघातात बळी पडलेले सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील आहेत. कुंभमेळ्यानंतर ते नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात आले होते. यानंतर ते देव दर्शनासाठी गुजरातला जात होते.