
कुंभमेळावरून परतताना रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला नाशिक जवळ झालेल्या भीषण अपघात माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचे सह तिघांचा मृत्यू, चार जण जखमी
कुंभमेळावरून परतताना रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला नाशिक जवळ भीषण अपघात होऊन या भीषण अपघातात माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचे सह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला
रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे अपघात झाला या अपघातातील एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातात आणखी तिघे जखमी झाले. या अपघातात निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई , वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील
जवळ पहाटे ४ वा. झाला.
सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरात धडक दिली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला. हा अपघात इतका भयावह होता की दोघांचे जागीच निधन झाले. श्री. अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई , निवृत्त शिक्षक श्री. रमाकांत पांचाळ सर, रत्नागिरीतील संतोष इलेक्ट्रॉनिक चे मालक संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर . किरण निकम, त्यांचे चिरंजीव . अक्षय निकम व नातेवाईक . प्रांजल साळवी तसेच वाहन चालक . भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते. यापैकी तिघांचे दु:खद निधन झाले तर . किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. . संतोष रेडीज, . रमाकांत पांचाळ सर व . प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.