
*भरणेतील मध्यवर्ती ठिकाणी अवजड वाहने वळवताना कराव्या लागत आहेत कसरती*
___मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी उड्डाण पुलासह चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीतील विस्कळीतपणा दूर झाला आहे. मात्र मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वळणावर अवजड वाहने असलेल्या वळणावर अवजड वाहने वळता वळेनाशी झाली आहेत. एसटी चालकांनाही वळण घेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच ठिकाणी दिशादर्शक फलकांचाही अभाव आहे. यामुळे अपघातांचा धोका कायमच आहे. याशिवाय वाहने वळण्यास लागणार्या विलंबामुळे सातत्याने वाहतूक कोंडीही होत आहे. www.konkantoday.com