
कोवीड मध्ये सहज सुलभतेने निदान करणेत यावे याकरिता जिल्हयात डायग्नोस्टिक कोवीड सेंटर सुरु
रत्नागिरी जिल्हयात कोवीड -१ ९ चे निदान सेंटर सुरु करण्यात येत आहेत . सध्या ९ तालुक्यात कोवीड केअर सेंटर सुरु आहेत . तसेच ४ डिसीएच आणि २ डिसीएचसी सुरु आहेत . जिल्हयातील सर्व जनतेला कोवीड मध्ये सहज सुलभतेने निदान करणेत यावे याकरिता जिल्हयात डायग्नोस्टिक कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहेत .त्याकरीता शहरी प्रा.आ.केंद्र झाडगांव , मेस्त्री हायस्कुल रत्नागिरी तसेच चिपळूण मधील नगर परिषद दवाखाना , उर्दुशाळा राजीवडा येथे सुरु करण्यात येत आहे . त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा
जर कोणाला सर्दी , ताप , खोकला , डोळे येणे , श्वास घेणेस त्रास होणे , ओठ व जीभ निळसर पडणे , भूक न लागणे , जीभेला कुठली चव नसणे , उशीरा कळणे ( Mental Confusion ) , छातीत दुखणे यापैकी कुठलेही लक्षण दिसले तर त्वरीत या कोवीड निदान सेंटरमध्ये चाचणी करणेस जाणे आवश्यक आहे . या सेंटरमध्ये लक्षणे आलेल्या व्यक्तींना प्रथमोपचार केले जातात व उपचार केल्यावर प्रतिसाद नसेल तर कोवीडची चाचणी केली जाते . जेणेकरुन लवकरात लवकर तपासणी होईल व लवकर उपचार सुरु होतील .
लवकर निदान व लवकर उपचार यामुळे कोवीड -१ ९ रुग्णांपासून इतरांना आजार पसरणार नाही . त्यामुळे सदर कोवीड निदान सेंटरमध्ये सर्वानी लाभ घ्यावा . तसेच अलगीकरण व विलगीकरण केलेल्या व्यक्तीनी स्वजबाबदारीने घरा बाहेर पडू नये , असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी असे आवाहन केले की , सामाजिक अंतर व प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे . व त्याप्रमाणे लक्षणे आलेस घरी न वसता त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलापूरकर यांनी सांगितले की उपरोक्त लक्षणे आढळल्यास पहिल्या दिवशीच प्रत्येकाने दवाखान्यात जावे . तसेच डॉक्टर बदलू नयेत . जेणेकरुन त्या डॉक्टरांना लक्षात येईल की आपल्याला औषधांना प्रतिसाद नाही . बरे वाटत नाही म्हणुन डॉक्टर बदलले तर निदान उशीरा होते . तसेच लवकर चाचणी करुन घेणे . या आजारामध्ये प्रतिकारशक्तीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे . त्याप्रमाणे प्रतिकारशक्ती वाढवण्यास नियमित व्यायाम , संतुलीत व पोषक आहार , फळे प्रथिने , जिवनसत्वे यांचा आहारामध्ये समावेश करावा . नियमित योगासने प्राणायाम आवश्यक आहे . घावरु पण दक्षता घ्या . तसेच अलगीकरण व विलगीकरण केलेल्या व्यक्तीनी स्वजबाबदारीने घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com