जिल्हा नियोजन समिती आणि कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

रत्नागिरी, दि.31 : राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय अवर सचिव सु. वि. कांबळी यांनी 28 जानेवारी रोजी प्रसिध्द केला आहे.

या शसन निर्णयात म्हटले आहे, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम 2000 मधील कलम 3 (3)(2)(ब) व (क) आणि कलम 3 (3) (4) (फ) मधील तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) (सुधारणा) नियम 2018 च्या अधिसूचनेतील परिच्छेद 7 (मूळ अधिनियमाचा नियम 6-अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक 202501281657414616 असा आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी या शासन निर्णयाबाबत जिल्ह्यातील विशेष निमंत्रित सदस्य आणि निमंत्रित सदस्यांना पत्राद्वारे अवगत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button