
क्रिकेट मॅच खेळत असताना सिंधुदुर्गातील पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले.ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.तेथे मैदानावर फिल्डींग करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. प्रवीण मांजरेकर यांनी कॉलेज जीवनापासूना पत्रकारितेला प्रारंभ केला.
प्रारंभी ‘तरुण भारत’चे सातार्डा वार्ताहर, त्यानंतर बांदा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. नंतर काळात ते सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना पत्रकारितेसाठी सावंतवाडी तसा जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कारही मिळाले होते.