
लायन्स क्लबच्यावतीने उभारण्यात आलेले चिपळुणातील बेटी बचाओ शिल्प वेधतेय लक्ष.
चिपळूण शहरातील दुर्गा आळी, पटेल स्वा मिल शेजारी लायन्स क्लब तर्फे २०१७ साली उभारण्यात आलेल्य बेटी बचाओ शिल्पाला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे हे शिल्प चिपळूणवासियांचे लक्ष वेधून घेत आहे.२०१७ मध्ये लायन्स क्लबचे तत्कालीन अध्यक्ष अजय भालेकर यांच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आलेली ही शिल्पकृती पुन्हा २०२५ मध्ये नवीन स्वरूपात सजविण्यात आली आहे.
येथे करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच त्याला देण्यात आलेला नवीन साज यामुळे चिपळूणवासियांचे लक्ष या प्रतिकृतीकडे वेधले जात आहे. या वेळी लायन्स क्लबचे जगदीश वाघुळदे अध्यक्ष आहेत. ज्यावेळी हे शिल्प उभारण्यात आले, त्यावेळी शहरातील नागरिकांनी याचे तोंड भरून कौतूक केले होते. लायन्स क्लब नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असताना अशा प्रकारचे शिल्पाकृती उभारून त्यातून देण्यात येणारा संदेश निश्चितच अर्थपूर्ण असल्याने या उपक्रमाचे कौतूक चिपळूणवासियांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com