
पणी टंचाईबाबत २० मे पर्यंत नियोजन न झाल्यास तहसिलदार कार्यालयावर मोर्चाने धडकणार ः आ. संजय कदम यांचा इशारा
चिपळूण ः जिल्ह्याप्रमाणे दापोली, मंडणगड, खेड या तीनही तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सामन्य जनतेला त्याला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी जिल्हा प्र्रशासन मात्र बेपर्वाई करून फक्त खुलासा करण्याचे काम करून जनतेची चेष्टा करत असल्याचा आरोप आमदार संजय कदम यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी २० मे पूर्वी या तीनही तालुक्यातील प्रत्येक टंचाईग्रस्त गाव, वाडीचे नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर प्रत्येक तहसिलदार कार्यालयावर हंडामोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला जाईल असाही इशारा कदम यांनी दिला.
टंचाईग्रस्त गावात व वाड्यात शासकीय अथवा खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र शासकीय टँकर कायम नादुरूस्त व चालक नसल्याने गावापर्यंत येवू शकत नाहीत. त्याचा फायदा खाजगी व्यावसायिक घेत असून त्याचा भुर्दंड सामान्य जनतेला सोसावा लागत आहे.