
रिंगणे, साटवली येथे रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांना मार्गदर्शन
रत्नागिरी : वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून आशा सेविकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी लांजा तालुक्यातील रिंगणे आणि साटवली येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी २३ जानेवारी रोजी हे आशा सेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आशा सेविका याना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात आले होते.

यावेळी रिंगणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या या शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास ढवळे, डॉ. सूरज काटकर, आरोग्य सहाय्यक डी आर कदम, यू व्ही जाधव गट प्रवर्तक एस एस शेट्ये उपस्थित होते. तर साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या मार्गदर्शन शिबिरावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दैठणकर, सुपरव्हायझर एस एस म्हेत्रे, सुनील कारेकर, डी के सावरटकर, एस बी सावंत, गटप्रवर्तक संपदा चव्हाण उपस्थित होते. तर धन्वंतरी रुग्णालयाकडून श्वेता कदम, ऐश्वर्या सिस्टर आणि अनुष्का सिस्टर यावेळी उपस्थित होते.