मोर्डे येथे घर आगीत भस्मसात

संगमेश्वर : तालुक्यातील मोर्डे येथे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद गावचे पोलीस पाटील गणेश गुरव यांनी दिली आहे. मोर्डे येथे रविंद्र राजाराम कोटकर यांच्या मालकीच्या घराला गुरुवारी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तलाठी शिंदे घटनास्थळी दाखल झाल्या. कोटकर कुटुंबीय घरी नसल्याने पंचनामा झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button