
महाराष्ट्राच्या चित्ररथावर मधाच्या गावाची प्रतिकृती
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर मधाच्या गावाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.२०२२ पासून शासनाच्या योजनेतून तयार झालेली मधांच्या गावांची यशोगाथा या माध्यमातून देशभरातील लोकांसमोर मांडली जाणार आहे.पण ज्यांची यशोगाथा या निमित्ताने मांडली जात आहे त्या मधाच्या गावातील लोक मात्र वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आपला हा व्यवसाय उभा करण्यासाठी धडपडत आहेत.