रत्नागिरी शहरातील माळनाका येथे शासकीय विश्रामगृहासमोर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी

रत्नागिरी शहरातील माळनाका येथे शासकीय विश्रामगृहासमोर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात. दोघे जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य चंद्रशेखर गोवळकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास माळनाका ते थिबा पॅलेस जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल लॅण्डमार्क समोर घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी नजवान सिराज भाटकर (रा. शिवखोल, राजिवडा, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एडब्लू८४४७) सोबत नागेश कृष्णा पवार यास घेऊन जात असताना लॅण्डमार्क हॉटेल येथे रस्ता ओलांडत असताना थिबापॅलेस ते माळनाका जाणाऱी दुचाकी (क्र. एमएच-०८ एएल ४५८१) वरील स्वार गोवळकर याने भाटकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नजवान भाटकर व नागेश पवार हे दोघे जखमी झालेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button