
संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील उपोषणाची जय्यत तयारी
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर तीन गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी करूनही त्याला वाटण्याच्या अक्षता लावणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात उद्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या ग्रुप तर्फे लक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. गेले अनेक महिने केवळ आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संगमेश्वर तालुक्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
याचाच एक भाग म्हणून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या संगमेश्वर वासियांना सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या संस्थेने उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. उद्या लक्षणिक उपोषण करून लोकशाही मार्गाने कोकण रेल्वे प्रशासनाला इशारा देणार आहेत. या उपोषणानंतरही थांबे न मिळाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे