कोणतेही काम उत्कृष्टपणे करा -श्रेयस तळपदे.
कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा, असे मत हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले. भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रूग्णालय येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.या निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण या ठिकाणी १५ वर्षापूर्वी देखील आलो होतो. श्री श्रेत्र डेरवण हे विविध प्रकारे विकसित झालेले आहे. जरी सर्व काही बदलले असले तरी येथील श्री क्षेत्राचा हेतू बदलला नाही.
कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा हे सांगताना त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले. रूग्णालयाकडून देण्यात येणार्या उत्कृष्ट वैद्यकीय सोयी सुविधा येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सर्वांचे भरभरून कौतूक केले. वालावलकर रूग्णालय मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, स्पोर्टस ऍकॅडमीची तसेच त्यांनी न्युक्लिअर मेडिसीन, लीनियर एक्सीलेटर विभागाला त्यांनी भेट दिली.www.konkantoday.com