रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार?

जागावाटपाबाबत अद्याप महायुतीचा फायनल फॉर्म्युला ठरलेला नाही. अशात ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.ठाण्याची जागा शिवसेना लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) राजन विचारे यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे गट) रवी फाटक याचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी राणेंच्या नावाची चर्चा होत आहे. तर पालघरच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे. शिवसेनेचे खासदर गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीये.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button