
जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला एक ऑगस्टपासून आरंभ होणार
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला एक ऑगस्टपासून आरंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी घेतलेल्या ७३७ शाळा शिक्षण विभागाने ताब्यात घेऊन त्या स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून वापरण्यास घ्या, अशा सूचना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या. कोरोना विषाणूबाधित तीस गावांमधील शाळांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर घेण्यात येणार आहे.शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी आढावा बैठक घेतली.
www.konkantoday.com