
कोरोनाविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या महत्वाच्या घडामाेडी
1) लॉकडाऊन दरम्यान जिल्हयात बाहेरील जिल्हयामधून कोणीही येवू नये यासाठी जिल्हा सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत.
2) रस्त्यावर दुचाकी वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
3) जिल्हयात जे.एस.डब्लू, जयगड पोर्ट तसेच येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्याकडे रोजंदारीवर असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.
4)इतर रोजंदारीवर असणाऱ्या कामगारांची सर्व तालुक्यातील संख्या 474 इतकी आहे. यापैकी राहण्याची व भोजनाची व्यवस्था नसलेल्यांची संख्या 21 आहे.
खेड येथे निवारा केंद्रात 12 व दापोली येथे 9 जणांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची व औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
5)येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली नाही. यापूर्वी तपासणीसाठी पाठविलेल्या 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
6)अत्यावश्यक सेवा अंतर्गत वाहन परवानगीसाठी ई-पास करिता covid19.mhpolice.in येथे अर्ज करता
येईल.
7) जिल्हयात होम क्वारंटाईनखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची कालपर्यंतची संख्या ७३५ इतकी आहे.
या व्यक्ती घरातच राहतील याची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे.
8) होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात 7057222233 हा व्हाट्सअप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 02352 222233 व 226248, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com