महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. हा करार औद्योगिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, मोठ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सदैव क्रमांक एक ची पसंती मिळत आहे.
या करारानुसार राज्यात ₹3,05,000 कोटींची प्रचंड गुंतवणूक होणार असून, 3,00,000 रोजगार संधी निर्माण होतील. या गुंतवणुकीत पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, अक्षय ऊर्जा, बायोएनेर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.या करारामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकासात नवीन मापदंड प्रस्थापित होईल. या करारानंतर राज्यात गुंतवणुकीसाठी झालेल्या सामंजस्य कराराचा आकडा १२ लाख कोटींच्या आसपास पोहोचला आहे.