
आमच्या २१ पैकी १८ खासदार जिंकणार असं महाराष्ट्रातलं वातावरण-संजय राऊत
जागावाटपात कुठलाही बदल होणार नाही, उमेदवार जाहीर झालेत. त्या त्या भागात उद्धव ठाकरे प्रचार सभा घेतायेत. फेऱ्या होतायेत, बैठका घेतल्या जातायेत.अशाप्रकारे नाराजी दाखवायची झाली तर आमचे लोकही अमरावती, कोल्हापूरलाही दाखवू शकतात. रामटेकला दाखवू शकतात असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. सांगली इथं काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यावरून राऊतांनी हे विधान केले.संजय राऊत म्हणाले की, जागावाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अडचणी येणार हे आम्ही गृहित धरलेच होते. त्यात सांगली, भिवंडीचा तिढा आहे. मुंबईतल्या जागेवरून वाद नाही. सांगली ही आम्ही घेतली. तिथं निवडणूक लढण्याची ताकद कमी आहे परंतु मतदार मशाल चिन्हावर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. २०१४, २०१९ या दोन्ही निवडणुकीत सांगलीत काँग्रेस नव्हती. ती जागा मित्र पक्षाला सोडली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली नाही कारण आम्ही त्यांना थांबवलं. आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादीचं काम आपण केले पाहिजे. भिवंडीत राष्ट्रवादी उमेदवाराचं काम आमचे लोक करतायेत. त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्या नेत्यांना समजावलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं.त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ३५ हून अधिक जागा निवडून येतील. आमच्या २१ पैकी १८ खासदार जिंकणार असं महाराष्ट्रातलं वातावरण आहे. महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकतील. देवेंद्र फडणवीस ४५ प्लस जागा म्हणतात, त्यांनाही प्रश्न विचारा. आम्ही ३५ हून अधिक जागा जिंकू असं सांगतोय. मेहनत करणाऱ्या पक्षाला आत्मविश्वास असायलाच हवा असं संजय राऊतांनी म्हटलं.www.konkantoday.com