
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होण्याची चर्चा.
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाणार आहे. उबाठाचे सहा खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे.
उद्या अमित शाह महाराष्ट्रात असून अमित शाहांच्या ग्रीन सिग्नलनंतर पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.शिवेसेनेतील एक खासदार मुंबई शहरातील तर इतर पाच खासदार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती समोर आली आहेत. मात्र, यांची नावं अद्याप समोर आली नाहीत.