
कोरोनाचा आढावा घेऊन गणेशोत्सवाला येणार्या चाकरमान्यांसाठी नियमावली -ना. अनिल परब
रत्नाागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अपेक्षेनुसार अद्यापपर्यंत कमी झालेली नाही. कोरोनाचा आढावा घेवूनच गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री ना. अनिल परब यांनी दिली.
कोकण रेल्वेच्यावतीने गणेशोत्सवाकरिता सोडण्यात येणार्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. प्रवाशांची प्रतिक्षा यादी तयार केल्याने कोकण रेल्वेमार्फत आणखी काही जादा गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेमार्फत ७२ जादा गाड्या दि. ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com