बीएसएनएलनं आणलाय पैसा वसूल प्लॅन! आता 10 महिने रिचार्जची झंजट नाही, मिळणार फ्री कॉलिंग अन् बरच काही!

आजकाल मोबाईल रिचार्ज प्लॅन प्रचंड महाग झाले आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने (व्हीआय) किंमती वाढवल्यानंतर, दोन नंबर वापरणे मोठे खर्चिक झाले आहे. अशा परिस्थितीत, आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी अतिशय परवडणारे आणि दीर्घ वैधतेचे प्लॅन सादर केले आहेत.

जर आपण खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या मासिक प्लॅनमुळे त्रस्त असाल तर, बीएसएनएलची नवीन ऑफर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीएसएनएलने एक असा प्लॅन सादर केला आहे ज्याची वैधता पूर्ण १० महिन्यांची (३०० दिवस) आहे. या योजनेद्वारे, आपण दरमहिन्याला रिचार्ज करण्याच्या झंझटीपासून सुटका मिळवू शकता.

BSNL चा ₹797 चा प्लॅन. हा प्लॅन खास अशा लोकांसाठी आहे, ज्यांना आपले सीम अधिक काळ सक्रिय ठेवायचे आहे. या प्लॅनची वैधता ३०० दिवसांची आहे. काय खास आहे या योजनेत जाणून घेऊयात…•

आउटगोइंग कॉल्स: पहिल्या ६० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध. ६० दिवसांनंतर कॉलिंग सुविधा बंद होईल.• डेटा : पहिल्या ६० दिवसांसाठी रोज २ जीबी हाय-स्पीड डेटा. एकूण १२० जीबी डेटा.• एसएमएस: पहिल्या ६० दिवसांसाठी दररोज १०० मोफत एसएमएस.• ६० दिवसांनंतर: डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सेवा बंद होतील.

मात्र, सिम सक्रिय राहील. यानंतर, सेवा वापरण्यासाठी दुसरे रिचार्ज करावे लागेल.महत्वाचे म्हणजे, बीएसएनएल सिमचा वापर दुय्यम क्रमांक म्हणून करणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button