
दापोली तालुक्यात ओळखीच्याच व्यक्तीकडून मारण्याची धमकी देत मुलीवर अनेकदा अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल
दापोली तालुक्यात एका गावात ओळखीच्याच व्यक्तीकडून मारण्याची धमकी देत मुलीवर अनेकदा अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे मुलीची प्रकृती बिघडल्याचे तिच्या आईच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघड झाला सदर व्यक्ती विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदापोली तालुक्यात ओळखीच्याच व्यक्तीकडून एका मुलीवर अनेकदा अत्याचार करण्याचा प्रकार घडला आहे या मुलीला दिवस गेल्याने प्रकरण आले उजेडात आले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे दापोली तालुक्यातील एका किनारपट्टीवरील गावामध्ये मुलीला धमकावून ओळखीच्याच इसमाने सातत्याने तीन ते चार वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारून समुद्रात फेकून देईल अशी धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने कोणालाही काहीही सांगितले नाही . 22 जानेवारी रोजी मासिक पाळी चुकल्याचे आणि मुलीला उलट्या होऊ लागल्याचे पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि आईने सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर ताबडतोब दापोली पोलीस स्थानक गाठलं. संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.