कोरेगाव संगलट रस्त्याची दुर्दशा प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा?

खेड तालुक्यातील कोरेगाव संगलट या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरदर्शझाली असल्याने या भागातील नागरिकआणि वाहनधारकातून संतापाची लाट पसरली आहे कोरेगाव संगलट रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने ह्या खड्यामध्ये वाहन गेल्याने अनेक अपघात होत आहे याबाबत संगलट ग्रामस्थांनी वेलोवेळी खेड येथील बांधकाम विभागाला भेट देऊन ह्या रस्त्याची समस्या मांडण्यात आली मात्र संबंधित अधिकारी हा रस्त्याबाबत कोणती दखल न घेता उडवा उडवी उत्तर देत आहेत या रस्त्यावरून रात्र दिवस चोरटी वाळू सुमारे 50 ते 60 डंपर धावत आहेत चिऱ्यांनी भरलेले चिऱ्याच्या ही धावत आहेत त्या मुलं रस्त्याची दुर्दशाही झाली आहे सदरची ही वाळू कर्जी बहिरोली परिसरातून येऊन चोरटी वाळू दापोली मंडणगड या तालुक्याला सप्लाय केली जाते सदरचा मार्ग हा चोरट असल्याने बहिरोली फाट्यावरून गाड्या न वलावताना संगलट कोरेगाव मार्गाने वळवल्या जात आहे सदरची बाब संबंधित अधिकाऱ्याला माहिती असून वाळू व चिरा व्यवसायिकावर महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही सदर हा रस्ता पावसाळ्यापूर्वी झाला नाही तर रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे सदरचा रस्ता खड्ड्यात कि खड्डे रस्त्यात असा प्रश्न निर्माण होत आहे या भागामध्ये कोणतेच आमदार देखील दखल घेत नाही आमदारांची भेट घेतल्यानंतर थातूरमातूर उत्तर देऊन जनतेला बोल बच्चन दिले जात आहेत त्यामुळे दाद कुणाकडे मागायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे जर याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही तर त्वरित आंदोलन करण्यात येईल असा जनतेतून चर्चा जोरदार सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button