
हर्णै वासियांची अनेक वर्षांची बंदराची मागणी पूर्ण होण्याची शक्यता.
कोकणात महत्वाचे ठरणारे व रत्नागिरी जिल्ह्यात मासेबारीत अग्रेसर असणारे हर्णै बंदर मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. मात्र असे असताना राज्यात बैलगाडीच्या माध्यमातून व छोट्या होड्यांच्या सहाय्याने मच्छी आणणारेही ते एकमेव बंदर आहे. यामुळे मच्छिमारांना जेटीअभावी मच्छी मोठ्या बोटीतून उतरवून किनार्यावर आणण्यासाठी कसरत करावी लागते.
मात्र राज्यमंत्री योगेश कदम यांनी लक्ष केंद्रीत केल्यानंतर ग्रामस्थांनी पाहिलेले ४० वर्षाचे सुसज्ज जेटीचे स्वप्न आता साकार होणार आहे. जेटीसाठी २०५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतर निविदा प्रक्रियाही पूर्ण होवून अखेर कामाने वेग घेतल्याचे चित्र बंदरात पहायला मिळत आहे.www.konkantoday.com